Sunday, January 2, 2011

उद्वेगबोध

उद्वेगबोधचा स्तंभ हा अनियतकालिकासारखा... अवतीभवतीच्या घडामोडींमुळे मनाला फारच क्षोभ होईल तेव्हा सर्वसामान्यांचा आवाज म्हणून लिहायचा असं मनात होतं. आताशा मन निबर झालंय असं वाटणारं घडत असतं दररोज, तरीही मनाची तगमग होत नाही, वैताग, उद्वेग होत नाही, काही काही वाटत नाही... पण, असंही होतं की कडेलोट होतो आणि उमटतंच काहीबाही कागदावर, संगणकावर... तोच हा उद्वेग - तुमचाआमचा सगळ्यांचा फक्त माझ्याकरवी व्यक्त होणारा

या उद्वेगबोधचा विषय वेगळा सांगायला नको, वाचल्यावर तुमच्या लक्षात येईलच
त्याआधीचे सगळे क्रमाने द्यायचा प्रयत्न आहे, वाचल्यावर कदाचित वाटेलही की तुमचा आणि माझा उद्वेग अगदी सेम आहे...

केवढे आम्ही हुश्शार...

आम्हाला कश्शाचेही सोयरसुतक नाही, आम्हाला कशाचीही तमा नाही.. लोकांचे, जनतेचे, राज्यांचे प्रश्न गेले उडत..आमचे भत्ते, आमच्या सोयीसुविधा मिळाल्याशी कारण..
पाण्याचा प्रश्न
 विजेचा प्रश्न 
रस्त्याचा प्रश्न
आरोग्य
 लटकलेले प्रश्न
 रखडलेले प्रकल्प
 आदिवासी कल्याण
 नक्षलवाद
 दहशतवाद
 काश्मीर समस्या
 उद्योगधंदे
 औद्योगिक प्रगती
 करआकारणी
 प्राप्तीकर
 मध्यमवर्ग
 नवश्रीमंत
 दूरसंचार
 दळणवळण
 उपग्रह
 विज्ञान-तंत्रज्ञान
 देशाची प्रगती
 अधोगती
 पिछेहाट..
 आम्हाला कश्शाचेही सोयरसुतक नाही, आम्हाला कशाचीही तमा नाही..
 लोकांचे, जनतेचे, राज्यांचे प्रश्न गेले उडत..
 आमचे भत्ते, आमच्या सोयीसुविधा मिळाल्याशी कारण..
 तेवढय़ासाठी तर आम्ही 22 दिवस रोज आलो, उपस्थितीच्या स्वाक्ष-या केल्या
 भत्ते लागू केले आणि मग काय दिवसभर उंडारलो, बोंबललो
 आम्ही कुणाचे नाही, आमचे कुणी नाही
 जनकल्याणाची, जनतेच्या पैशांची आम्हाला फिकीर नाही
 22 दिवसांत एकही काम पुढे सरकले नाही, एकही प्रश्न सुटला नाही
 केवढे आम्ही हुश्शार, 148 कोटी रुपये घालवले बेक्कार! 
(15 December, 2010)

No comments:

Post a Comment