Wednesday, April 27, 2011

लिहायचं की वाचायचं...

माझ्या मनात पुन्हा तोच सनातन संघर्ष सुरू झालाय... लिहायचं की वाचायचं... मोठ्या उत्साहात ब्लॉग लिहायचा संकल्प सोडला होता आणि आता प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर ब्लॉग लिहिणचं सोडल्यागत झालंय. आपल्या परिचयातील दोन-पाच लोक कौतुकानं वाचतात ब्लॉग, त्यापुढे काय असाही एक प्रश्न मीच मला विचरात असतो. तीही सबबच लिहायचं नाही म्हणून... लिहायचं नाही म्हणजे कंटाळा येतो किंवा काही सुचत नाही म्हणून थांबलोय असंही नाही. पण वाटतं की कितीजणांनी इतकं उत्कृष्ट लिहून ठेवलंय तेच वाचायला वेळ पुरत नाही तर लिहिण्यात आणखी वेळ घालवणं कसं काय बुवा योग्य आहे.. मग लिहायचं असलं तरी टाळलं जातं. पण मी थांबलोय हे काहींच्या लक्षात आलं आणि त्यांनी आस्थेनं विचारलं म्हणून पुन्हा हे इतकं लिहिलं... आता कदाचित लिहिन वा थांबेनही... पाहू !!

2 comments:

  1. शैलेंद्र,
    "आपल्या परिचयातील दोन-पाच लोक कौतुकानं वाचतात ब्लॉग, त्यापुढे काय असाही एक प्रश्न मीच मला विचरात असतो."
    मुळात खरे तर हा प्रश्न पडला नाही पाहिजे राव.आपले लिखाण हे कोणीतरी वाचावे म्हणून ते न लिहिता जर ते उस्फुर्तपणे म्हणजे आत्ता सारखे आले असेल तर अगदी माझ्या सारखा अनोळखी सुद्धा वाचू शकतो हे लक्षात घ्या.प्रत्येक जण हा जसा अगदी कोट्याधीश श्रीमंत वा गरीबच नसतो,त्या प्रमाणे तो अगदी पट्टीचा लेखकच असतो/असावा हा काही नियम नाहीये त्या मुळे बिनधास्त पणे लिहित जा.आम्ही आहोत वाचायला.:))

    ReplyDelete
  2. शैलेंद्र नमस्कार,
    तुम्हाला प्रश्न पडला लिहायचं की वाचायचं? अहो आम्ही आहोत की वाचायला.तुम्ही छान लिहीता.कंटाळा न करता लिहीत रहा.तुम्हाला खुप
    शुभेच्छा..

    ReplyDelete